Manish Sisodia: सिसोदियांची रात्र CBI मुख्यालयातच; आज न्यायालयात करणार हजर | पुढारी

Manish Sisodia: सिसोदियांची रात्र CBI मुख्यालयातच; आज न्यायालयात करणार हजर

पुढारी ऑनलाईन: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने काल म्हणजेच रविवारी (दि.२६) मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक केली. सिसोदिया यांनी मद्य घोटाळ्यात गुन्हेगारी कट रचला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप CBI ने केला आहे. रविवारी (दि.२६) रात्री अटक केल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाला पाचारण करून, त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण रात्र सिसोदियांना CBI मुख्यालयातच ठेवण्यात आले. त्यामुळे आपनेते मनीष सिसोदिया यांना सीबीआय मुख्यालयातच संपूर्ण रात्र काढली लागली. पण आज सोमवारी (दि.२७) सीबीआय मनीष सिसोदिया यांना राऊस एवेन्यू कोर्टात हजर केले जाणार आहे.

अटकेसाठी ‘आप’ने भाजपला धरले जबाबदार

आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेसाठी आम आदमी पक्षाने भाजपला जबाबदार धरले आहे. लोकशाहीसाठी हा काळा दिवस असल्याचं आम आदमी पक्षाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. लाखो मुलांचे भविष्य घडवणाऱ्या जगातील सर्वोत्तम शिक्षणमंत्र्यांना भाजपने एका खोट्या प्रकरणात अटक केली. या घटनेवर अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकार प्रामाणिक लोकांना अडकवत आहे, त्यांच्यावर कारवाई करत आहे, तर भाजप घोटाळे करणाऱ्यांना संरक्षण देत आहे, असे म्हटले आहे.

आम आदमी पार्टीकडून देशभरात आज निदर्शने

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, आम आदमी पार्टीला चिरडण्याचा हा प्रयत्न आहे. याची स्क्रिप्ट भाजपच्या मुख्यालयात लिहिली गेली असून, तपास यंत्रणा भाजपचे एक युनिट म्हणून काम करत आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेविरोधात आम आदमी पार्टी आज देशभरात निदर्शने करणार आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात देखील सिसोदिया यांच्या अटकेविरोधी निदर्शने करण्यात येणार असल्याचे आपने म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button