मद्य धोरण प्रकरण : उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची आज सीबीआय चौकशी; घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्‍त | पुढारी

मद्य धोरण प्रकरण : उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची आज सीबीआय चौकशी; घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्‍त

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी आज (रविवार) हजर राहण्याचे निर्देश सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांना दिले होते. त्‍या पार्श्वभूमीवर आज मनीष शिसोदिया हे सीबीआयच्या कार्यालयात उपस्‍थित राहणार आहेत. शिसोदिया यांच्या समर्थकांकडून तसेच आपकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता त्‍यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सिसोदिया यांच्या अटकेची भीती आपला सतावत आहे…

आम आदमी पक्षाला अशी भीती आहे की, सीबीआयकडून मनीष शिसोदिया यांना अटक केली जाउ शकते. त्‍यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातल्‍या भाजप सरकारवर निशाना साधला आहे.

आज पुन्हा सीबीआयच्या कार्यालयात जात आहे. सगळ्या चौकशीत मी पूर्ण सहकार्य करणार आहे. लाखो मुलांचे प्रेम आणि कोट्यवधी लोकांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. काही महिने जेलमध्ये राहायला लागले तर त्‍याची मला परवा नाही. मी भगतसिंग यांचा अनुयायी आहे. भगतसिंग यांनी देशासाठी आपल्‍या प्राणाची आहुती दिली. त्‍यामुळे अशा खोट्या आरोपांसाठी जेल जाणे ही छोटी गोष्‍ट आहे असे ट्वीट मनीष शिसोदिया यांनी केले आहे. दरम्‍यान आम आदमी पार्टी आणि केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.

 

हेही वाचा : 

 

Back to top button