राहुरी : सोशल मीडियामुळे लाथा, बुक्क्यांनी बेदम मारहाण | पुढारी

राहुरी : सोशल मीडियामुळे लाथा, बुक्क्यांनी बेदम मारहाण

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : इन्स्टाग्राम ग्रुपवर एका धर्माबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या कारणावरून सात- आठ तरुणांनी शहरातील सोनार गल्ली येथील ओमकार विक्रम डहाळे या तरुणास घरासमोर दांडा, फायटर व लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकारामुळे दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेकडो तरुणांनी पोलिस ठाण्यात गर्दी केल्याचे चित्र (दि.23) फेब्रुवारी रोजी दुपारी दिसले.

राहुरीत कसई गल्ली येथे काही तरुणांचा इन्स्टाग्राम ग्रुप आहे. 23 रोजी ग्रुपवर एका तरुणाने धर्माबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ती ग्रुपवर पाहून दुपारी 1 वाजे दरम्यान कसई गल्ली येथील आठ तरूणांच्या गटाने सोनार गल्ली येथील ओमकार डहाळे यास घरासमोर पोस्टबाबत विचारणा केली. यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक होऊन कसई गल्ली येथील तरूणांच्या गटाने ओमकार डहाळे यास दांडा, फायटर व लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

यावेळी ओमकार याची आई भांडण सोडविण्यास आल्या असता त्यांना मारहाण करुन, जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत ओमकारच्या गळ्यातील 11 ग्रॅमची सोन साखळी गहाळ झाली. दोन्ही गटांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस ठाणे आवारात दोन्ही गट समोरा- समोर आल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला. श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी पाहणी करून माहिती घेतली.

Back to top button