कोल्हापूर : गृहमंत्री अमित शहा यांचे आगमन (व्हिडिओ) | पुढारी

कोल्हापूर : गृहमंत्री अमित शहा यांचे आगमन (व्हिडिओ)

 उजळाईवाडी ; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कोल्हापूर विमानतळावर आज (दि.१९) दुपारी तीनच्या सुमारास आगमन झाले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे स्वागत केले. गृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यावरून कोल्हापूर विमानतळावर 2 वाजून 50 मिनिटांनी आगमन झाले. त्यांच्या पत्नी सोनल शहा  त्यांच्यासोबत आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत करताना पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, आमदार गोपीचंद पडळकर,आमदार प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, भाजपचे नगराध्यक्ष राहुल चिकोडे, शिराळ्याचे सत्यजित पाटील, सत्यजित कदम आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button