Hansika Motwani : हंसिकाला आईने दिलेल्या हार्मोनल इंजेक्शन? चा खुलासा | पुढारी

Hansika Motwani : हंसिकाला आईने दिलेल्या हार्मोनल इंजेक्शन? चा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘शाका लाका बूम बूम’ मध्ये बालकलाकार म्हणून भूमिका साकारणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी ( Hansika Motwani ) चर्चेत आली आहे. हंसिकाने बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याच्यासोबतच्या ‘कोई मिल गया’ चित्रपटानंतर हिमेश रेशमिया याच्या ‘आप का सुरूर’ (२००७) पहिल्यांदा डेब्यू केलं. मात्र, यानंतर हंसिका इतक्या लवकर मोठी कशी काय दिसायला लागली? यावर अनेकांनी तर्क- वितर्क लावले. याच दरम्यान हंसिकाच्या आईने तिला मोठे दिसण्यासाठी हार्मोनलचे इंजेक्शन दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यानंतर आता तिच्या आईने आणि हंसिकाने स्वत: याबाबतचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री हंसिका मोटवानी ( Hansika Motwani ) तिची आई मोना मोटवानी दोघेजणी नुकतेच ‘लव्ह शादी ड्रामा’ (Love Shaadi Drama) या रिॲलिटी शोच्या एपिसोडमध्ये पोहोचल्या. यावेळी हंसिकाने सोहेल कथुरियासोबतच्या लग्नाची घोषणा करत अनेक गोष्टींचा खुलासा केला. खास करून आईने दिलेल्या हार्मोनल इंजेक्शनच्या अफवांचा तिने खुलासा केला.

ती फक्त अफवा होती

यात हंसिकाने मागील गोष्टीचा आठवण करत म्हटलं की, ‘एक स्टार असण्याची मला किंमत मोजावी लागली होती, जेव्हा मी फक्त २१ वर्षांची होते. मी कोणत्या घटनेबद्दल बोलत आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे. तरी पण सांगते की, माझ्या आईने मला मोठे दिसण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन दिल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. त्यावेळी हे जर मी इंजेक्शन घेतले असते तर आताही मी हे घेवू शकते. ती फक्त अफवा होती. त्यावेळी ज्या परिस्थितीतून गेले याची जराही कल्पनाही करू शकत नाहीत.’

हंसिकाची आई मोना मोटवानी म्हणाली की, ‘हे जर खरं असते तर आमचा टाटा, बिर्ला याच्यासारखे करोडपतीच्या यादीत समावेश झाला असता. परंतु, सध्याच्या परिस्थितीवरून तुम्ही तर सर्व जाणता आहात. त्यावेळी मला हार्मोनल इंजेक्शनचा वापर कशा पद्धतीने करायचा माहित असते तर सर्वांनाच ते दिले असते आणि मोठे व्हा म्हटंल असतं. ही अफवा पसरविणाऱ्या काहीच कळत नाही. पंजाबी पंरपरेत मुली १२ ते १६ वयोगटानंतर मोठ्या दिसायला लागतात. यामुळे नेटकऱ्यांनी अनेक तर्क-वितर्क लावले होते.’ हंसिकाचे सोहेल कथुरियासोबत डिसेंबर२०२२ मध्‍ये लग्न थाटामाटात पार पडलं होतं.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

Back to top button