‘वेड’नं याड लावलं… | पुढारी

‘वेड’नं याड लावलं...

रितेश देशमुख-जेनिलिया देशमुख यांच्या वेड सिनेमाची जादू अजूनही कायम आहे. वेड प्रदर्शित होऊन तब्बल दीड महिन्याचा कालावधी लोटला. तरीही संपूर्ण राज्यात तो गाजत आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा कमाईचे नवीन मोडत चालला आहे. नुकतीच या सिनेमाबद्दल सुखद बातमी समोर आली असून त्यामुळे तमाम मराठमोळ्या प्रेक्षकांना आनंदच होईल. जगभरात ‘वेड’ने 74 कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून भारतात 60. 67 कोटींचा गल्ला जमवला आहे. यातील सलमान खानचे वेड लावलंय हे विशेष गाणे प्रचंड गाजले. मराठी कलाकारांपासून बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी या गाण्यावर रील व्हिडीओ बनवले आहेत. जिया शंकर, अशोक सराफ, विद्याधर जोशी या अन्य कलाकारांनी या चित्रपटात कसदार अभिनय केला आहे. काही का असेना या निमित्ताने मराठी चित्रपट कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊ लागले आहेत हेही नसे थोडके.

Back to top button