CBSE कडून ChatGPT वापरण्यावर बंदी, 10वी, 12वी परीक्षेदरम्यान मोठा निर्णय | पुढारी

CBSE कडून ChatGPT वापरण्यावर बंदी, 10वी, 12वी परीक्षेदरम्यान मोठा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : CBSE Board Exams 2023 : सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा बुधवारपासून सुरू झाल्या आहेत. परीक्षा यशस्वी करण्यासाठी मंडळातर्फे संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रे तयार आहेत, प्रवेशपत्रे आधीच दिली आहेत. दरम्यान, सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित चॅटजीपीटी वापरण्यास बंदी घातली आहे. परीक्षेपूर्वी मंडळाने जारी केलेल्या सूचनांनुसार मोबाइल, चॅटजीपीटी आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू परीक्षा हॉलमध्ये नेण्यास परवानगी दिली जाणार नाही.

ChatGPT म्हणजे काय

ChatGPT (चॅट जनरेटिव्ह प्री-ट्रेंड ट्रान्सफॉर्मर), जे नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आले आहे. यात इनपुटच्या आधारे भाषण, गाणी, मार्केटिंग कॉपी, वृत्तपत्र आणि विद्यार्थ्यांचे निबंध इत्यादी सहज लिहिता येतात. ही नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्रणाली आहे जे एक लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) म्हणून ओळखले जाते. हे माणसांप्रमाणेच लिहिण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी वापरले जाते.

Back to top button