पुणे : शिर्डी, सोलापूर मार्गावर धावणार वंदे भारत एक्स्प्रेस | पुढारी

पुणे : शिर्डी, सोलापूर मार्गावर धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि 10) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नव्या दोन वंदे भारत गाड्यांचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन होणार आहे. त्यानंतर या गाड्या मुंबई – साईनगर शिर्डी आणि मुंबई – सोलापूर या मार्गावर धावतील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 22223 मुंबई – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून (दि. 12) रोजीपासून दररोज (मंगळवार वगळता) सकाळी 06.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 11.40 वाजता साईनगर शिर्डीला पोहोचेल. तर ट्रेन क्र. 22224 साईनगर शिर्डी – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस साईनगर शिर्डी (दि. 11)पासून दररोज (मंगळवार वगळता) सायंकाळी 05 वाजून 25 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. दरम्यान ही गाडी दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबे घेईल.

मुंबई- सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक 22225 मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून (दि.11) पासून दररोज (बुधवार वगळता) सायंकाळी 4 वाजून05 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी वाजता सोलापूरला पोहोचेल.
तसेच, गाडी क्रमांक 22226 सोलापूर-मुंबई वंदेभारत एक्स्प्रेस (दि.11) पासून दररोज (गुरुवार वगळता) सोलापूर येथून सकाळी 06 वाजून 05 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. दरम्यान ही गाडी दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथे थांबा घेईल.

Back to top button