औरंगाबाद भेटीचा अनुभव अविस्मरणीय – हिलरी क्लिंटन | पुढारी

औरंगाबाद भेटीचा अनुभव अविस्मरणीय - हिलरी क्लिंटन

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : वेरुळ लेनितील अद्वितीय कला, आणि औरंगाबाद, परिसरात घालवलेला वेळ व प्रवास आनंददायी, अविस्मरणीय असा होता, असे मत अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी व्यक्त केले. त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.

मंगळवारी (दि.७) हिलरी क्लिंटन यांचे आगमन औरंगाबाद विमानतळावर झाले होते. यानंतर त्या खुल्ताबादकडे रवाना झाल्या. खुल्ताबाद येथील एका फार्म हाऊसवर त्या थांबल्या होत्या. वेरूळ आणि खुल्ताबाद भागातील निसर्ग रम्य वातावरणात त्यांनी दोन दिवस घालवले. बुधवारी हिलरी क्लिंटन यांनी वेरूळ लेणीला भेट दिली. यावेळी वेरूळ लेणीची पुर्ण माहितीही त्यांनी गाईड अलीम कादरी यांच्याकडून घेतली होती. यावेळी वेरूळ लेणीत काही पर्यटकांशीही त्यांनी संवाद साधला होता.

वेरूळ लेणीचे ही ऐतिहासिक वास्तु पाहून त्या भारावल्या होत्या. गुरूवारी(दि.९) दुपारी १ वाजेच्या दरम्यान त्यांचे आगमन विमानतळावर झाले. या ठिकाणी विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे, सीआयएसएफचे कमाडंट पवन कुमार यांच्यासह अन्य मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळावर माध्यमांशी बोलताना, हिलरी क्लिंटन यांनी औरंगाबाद आणि वेरूळ दौरा हा अभुतपुर्व राहिल्याचे सांगितले. भारताच्या एका भागात अशी आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी वास्तुला भेट दिल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केला. औरंगाबादचा प्रवास आनंददारी राहिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का?

Back to top button