पुढारी ऑनलाईन : मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेश करण्याची पूर्ण मुभा असून, त्या मशिदीत नमाज पठण करू शकतात, असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने म्हटले आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने या संदर्भातील प्रतिज्ञापत्र गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केले. (Muslim Women Mosque Entry)
सर्वोच्च न्यायालयात फराह अन्वर हुसैन शेख विरुद्ध केंद्र सरकार असा खटला सुरू आहे. मुस्लिम महिलांना मशिदीत नमाज पठणासाठी परवानगी मिळावी, अशी मागणीचा हा खटला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने वकील एम. आर. शमशाद सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत.
"नमाज पठाणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात. मशिदी नमाज पठणाचा अधिकार वापरायचा का नाही, हे सर्वस्वी महिलांनी ठरवायचे आहे," असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
"मशिदीतील नमाज पठण ही पूर्ण खासगी बाब आहे, त्यावर मशीद आणि तेथील मुतव्वली यांचे नियंत्रण असते, त्यामुळे पर्सनल लॉ बोर्ड अशा प्रकारी व्यवस्था उभी करण्यासाठी लक्ष घालू शकत नाही," असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. "प्रतिवादी आणि न्यायालय धार्मिक स्थळांच्या सविस्तर व्यवस्थापनात लक्ष घालू शकत नाही, याचे कारण अशी ठिकाणी खासगीरीत्या नियंत्रित असतात," असे लॉ बोर्डने म्हटलं आहे.
इस्लाममध्ये महिलांना शुक्रवारीची नमाज पठण जमातमध्ये करण्याची सक्ती नाही. मशिदीत नमाज पठण करायची की घरी, यातील पर्याय निवडण्याची मुभा महिलांना आहे. मक्का आणि मदिना येथे पुरुष आणि महिलांना नमाज पठणासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. प्रार्थनेसंदर्भात जे शिष्टाचार आहेत विशेष करून पुरुष आणि महिला एकत्र असू नये, याचे पालन सर्वांनी स्वेच्छेने, प्रामाणिकपणे आणि कठोरपणे करावे, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
हेही वाचा :