Mohammed Shami : मोहम्मद शमीचा भेदक मारा, वॉर्नरची दांडी गुल (VIDEO) | पुढारी

Mohammed Shami : मोहम्मद शमीचा भेदक मारा, वॉर्नरची दांडी गुल (VIDEO)

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या मैदानावर सुरू आहे. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने बाद केले. शमीने टाकलेल्‍या  चेंडू  खेळपट्टीवर पडताच स्‍विंग झाला. वॉर्नरला काही समजण्‍याच्‍या आतच स्टंप हवेत उडत लांब जाऊन पडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. डेव्हिड वॉर्नर केवळ एका धाव करत बाद झाला.  (Mohammed Shami)

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर आटोपला (Mohammed Shami)

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर आटोपला. रविचंद्रन अश्विनने स्कॉट बोलंडला क्लीन बोल्ड करून कांगारू संघाचा डाव संपवला. बोलंडला आपले खातेही उघडता आले नाही. या डावात ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबुशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने 37 आणि अॅलेक्स कॅरीने 36 धावा केल्या. त्याचवेळी पीटर हँड्सकॉम्ब 31 धावा करून बाद झाला. या चौघांशिवाय एकाही कांगारू फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. तीन खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. भारताकडून रवींद्र जडेजाने पाच आणि अश्विनने तीन बळी घेतले. मोहम्मद शमी आणि सिराजला प्रत्येकी एक विकेट मिळाली.(Mohammed Shami)

सूर्यकुमार यादवला मिळाली संधी

सूर्यकुमार यादवने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटच्या माध्यमातून सूर्यकुमारने आपल्या दमदार फलंदाजीने चाहत्यांची, प्रशिक्षकांची मने जिंकली. त्यामुळेच त्याला कसोटी क्रिकेटमध्ये संधी देण्यात आली आहे. तो भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा ३०४ वा खेळाडू ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सूर्यकुमार कशी कामगिरी करेल, याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.(Mohammed Shami)

हेही वाचंलत का?

Back to top button