Eknath Shinde Birthday : उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा | पुढारी

Eknath Shinde Birthday : उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन डेस्क :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्‍छा दिल्‍या.  ठाणे येथील निवासस्थानी त्‍यांनी मुख्‍यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.  ( Eknath Shinde Birthday)

“महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, या शुभकामना! असं ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छा भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी  एकनाथ शिंदे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्‍छा देताना देवेंद्र फडणवीस, सोबत आमदार निरंजन डावखरे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या शुभेच्छा संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.

हेही वाचा 

 

Back to top button