नगर : दाम्पत्यास रस्त्यात अडवून लुटणार्‍या तिघांना अटक | पुढारी

नगर : दाम्पत्यास रस्त्यात अडवून लुटणार्‍या तिघांना अटक

नगर; पुढारी वृत्तसेवा : मोटारसायकलवर चाललेल्या पती-पत्नीस भरदिवसा रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत लुटणार्‍या चार जणांच्या टोळीतील तिघांना एलसीबीने अटक केली आहे. राहुरीतील मोमीन आखाडा येथून आरोपींना पोलिसांनी अटक केली.
अंबादास अशोक खेमनर, नागेश्वर संजय चव्हाण (दोघे रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) तसेच एक अल्पवयीन असे अशा तिघांना पोलिसांनी अटक केली.

कांचन रविंद्र घोरपडे (रा.अस्तगाव, ता. राहाता) या त्यांचे पती रविंद्र घोरपडे मोटार सायकलवरून देहरे गावच्या शिवारातून जात असताना रस्त्यात ते थांबले होते. दोन मोटारसायकलवरून चार जणांनी रविंद्र घोरपडे यांना मारहाण केली होती. चाकूचा धाक दाखवून घोरपडे यांच्या जवळील 5 हजार रुपये रोख आरोपी घेवुन गेले होते. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एलसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना आरोपींची माहिती मिळताच त्यांनी एक पथक राहुरीतील मोमीन आखाडा येथे पाठविले. पुढील कारवाई एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

Back to top button