पुणे : सरकारमध्ये महिला आघाडीला संधी देणार : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

 पुणे : सरकारमध्ये महिला आघाडीला संधी देणार : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

 पुणे : पुढारी वृत्तसेवा :  भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम चांगल्यारितीने सुरू आहे. महिला संघटनाला बळकटी मिळत आहे, त्यामुळे आगामी काळात सरकारमध्ये महिला आघाडीला जास्तीत जास्त संधी देण्याचे काम केले जाईल असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. भाजप महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक पुण्यात शुक्रवारी झाली.

यावेळी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, उपाध्यक्षा प्रणिता देवरे- चिखलीकर, महिला शहराध्यक्षा अर्चना पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ माजी खासदार संजय काकडे, शहर सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होते. बावनकुळे यांनी या वेळी महिला आघाडीच्या मागे ताकदीने उभे राहू असे सांगितले.

तसेच धन्यवाद मोदीजी हे कार्ड जास्तीत जास्त करण्याचे आवाहन केले. तर महिलांना प्रोत्साहन देताना वाघ यांनी येणार्‍या दिवसात भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश हा देशातील सर्वोत्तम आणि उत्कृष्ट असा महिला मोर्चा असेल असे सांगितले. यावेळी महिला सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न आणि शंकाचे उपस्थितांनी निरसन केले. शहराध्यक्षा अर्चना पाटील यांच्या तीन वर्षाच्या कार्याकाळावर आधारीत प्रवास अहवालाचे प्रकाशनही उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

Back to top button