धान खरेदीला १५ दिवसांची मुदतवाढ; उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश | पुढारी

धान खरेदीला १५ दिवसांची मुदतवाढ; उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

नागपूरः पुढारी वृत्तसेवा : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धान केंद्रांवरील धान खरेदी प्रक्रियेला आणखी १५ दिवस मुदतवाढ देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत.

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आहेत. शासकीय धान केंद्रावर धान खरेदी करण्याची मुदत ३१ जानेवारीला संपुष्टात आली. त्यामुळे धान खरेदीचे पोर्टल्स बंद करण्यात आले. त्यामुळे भंडाऱ्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील ११५ धान खरेदी केंद्रांवरील खरेदीची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होती. धान खरेदी बंद झाल्याने हजारो शेतकरी अडचणीत आले आहेत. यासंदर्भात स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे समस्या मांडल्यावर फडणवीस यांनी प्रशासनाला धान खरेदी प्रक्रियेला आणखी १५ दिवस मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले. या मुदतवाढीमुळे धान उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button