CNG Price : मुंबईकरांना मोठा दिलासा; सीएनजी झाला अडीच रुपयांनी स्वस्त | पुढारी

CNG Price : मुंबईकरांना मोठा दिलासा; सीएनजी झाला अडीच रुपयांनी स्वस्त

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या परिसरात सीएनजीच्या दरामध्ये मंगळवारी मध्यरात्री पासून २.५० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिडेट (एमएनजीएल) ने घेतला आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात वाहन चालकांना एक किला सीएनजीसाठी ८७ रुपये मोजवे लागतील. हा निर्णय १ फेब्रुवारी २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे. (CNG Price)

सध्या मुंबईमध्ये १ किलो सीएनजीसाठी वाहन चालकांना ८९.५० रूपये मोजावे लागतात. आता त्यांना एक फेब्रुवारी पासून अडीच रुपये कमी प्रमाणे म्हणजे ८७ रुपये प्रति किलो सीएनजी उपलब्ध होणार आहे. सीएनजीचे दर अडीच रुपयांनी कमी झाल्याने मुंबईकरांना या महागाईच्या दिवसात मोठा दिलासा मिळाला आहे. (CNG Price)

सीएजी गॅसची वाढती मागणी. स्थानिक गॅसची कमतरता व आयात गॅस महागल्यामुळे सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत होते. या वाढत्या दरवाढीवर एमएनजीएलने ग्राहकांना थोडासा दिलासा देत सीएनजीचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अडीच रुपयांनी सीएनजीचे दर कमी करत मुंबईकरांना आता ८७ रुपये दराने सीएनजी उपलब्ध होणार आहे. सध्याच्या मुंबईतील पेट्रोलच्या दरापेक्षा नवे सीएनजीचे दर हे ४४ टक्क्यांनी कमी आहेत आणि सीएनजी सारख्या नॅचरल स्त्रोतचा अधिका-अधिक वापर करुन पर्यावरणाची हाणी टाळावी, असे आवाहन सुद्धा यावेळी एमएनजीएलने आपल्या ग्राहकांना केले आहे.

CNG Price

अधिक वाचा :

Back to top button