Sunny Leone : सनी लियोनी चित्रपटाच्या शूटिंगवेळी झाली जखमी | पुढारी

Sunny Leone : सनी लियोनी चित्रपटाच्या शूटिंगवेळी झाली जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी ( Sunny Leone ) तिच्या आगामी ‘कोटेशन गँग’ या चित्रपटाच्या शूटिगमध्ये बिझी आहे. याच दरम्यान सनीच्या एक छोटासा अपघात झाला आहे. यात तिला तिच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) ने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सनीच्या पायाला जखम झाल्याचे आणि त्यातून रक्त येत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सनी खूपच घाबरलेली असून तिचे इतर लोक जखम साफ करण्याचा प्रयत्नात आहेत. परंतु, सनी इजेक्शनचे नाव घेताच जोरजोरात ओरडताना दिसतेय. शेवटी मात्र, सनीचा हात पकडून जखम साफ केली जाते.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘कोटेशन गँग या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी माझा अपघात झाला आहे. माझ्या पायाला जखम झाली असून वेदना होते आहेत. माझी सेटवर काळजी घेतली जात आहे.’ असे लिहिले आहे. यावरून कोटेशन गँगच्या शूटिंगदरम्यान सनी जखम झाल्याची माहिती मिळत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी सनी तब्येतीची काळजी करत कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने ‘काळजी घे’, ‘दुखापत हिला झाली आहे आणि त्रास मलाच होत आहे’. असे म्हटलं आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

Back to top button