Sanjay Raut Vs Kirit Somaiya : ‘मिस्टर पोपटलाल’ म्हणत संजय राऊतांनी सोमय्यांना पुन्हा डिवचले | पुढारी

Sanjay Raut Vs Kirit Somaiya : 'मिस्टर पोपटलाल' म्हणत संजय राऊतांनी सोमय्यांना पुन्हा डिवचले

पुढारी ऑनलाईन : शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि भाजपचे किरीट सोमय्या यांच्यातील शाब्दिक वार-प्रतिवार (Sanjay Raut Vs Kirit Somaiya) अद्याप तरी थांबायचे नाव घेत नाहीत. यातच संजय राऊत यांनी पुन्हा किरीट सोमय्यांना ‘मिस्टर पोपटलाल’ म्हणत केलेल्या ट्विटमधून सोमय्या यांना डिवचले आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये (Sanjay Raut Vs Kirit Somaiya) म्हटले आहे की, भाजपचे किरीट सोमय्या म्हणजेच पोपटलाल माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. तसेच शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर विनाकारण चिखलफेक करत आहेत. यावर मी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे ‘मिस्टर पोपटलाल’ यांना लवकरच कायदेशीर नोटीस दिली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुढे त्यांनी लवकरच सत्याचा विजय होईल असेही या (Sanjay Raut Vs Kirit Somaiya) ट्विटमध्ये म्हटले आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांना डिवचत या ट्विटच्या माध्यमातून आता ‘होऊन जाऊदे’ असे आव्हानही त्यांना दिले आहे.

हेही वाचा:

Back to top button