रायगड जिल्ह्यातील माणगावजवळ कार-ट्रकचा भीषण अपघात; चिमुकल्यासह १० ठार | पुढारी

रायगड जिल्ह्यातील माणगावजवळ कार-ट्रकचा भीषण अपघात; चिमुकल्यासह १० ठार

गुहागर, पुढारी वृत्‍तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगावजवळील रेपोली येथे आज गुरूवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कार व ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. तर या अपघातात बचावलेल्या चार वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातातील सर्व गुहागर तालुक्यातील हेदवी जुवेवाडी येथे एका कार्यक्रमाला जात होते.

अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य  केले. तसेच, अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी मार्गावरील अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली आहे.

लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक MH-43 /U/ 7119 व मुंबईकडून गुहागरकडे जाणारी गाडी क्र. MH- 48 BT8673 यांच्यामध्ये रायगडमधील माणगावजवळ रेपोली येथे समोरासमोर धडक झाली. या अपघातात 10 जणांचा जागीच मृत्‍यू झाला.

अपघातात मृत्युमुखी झालेले अमोल रामचंद्र जाधव (वय 40, हेदवी गुहागर तालुका), दिनेश रघुनाथ जाधव (वय 35, हेदवी गुहागर तालुका), नंदिनी निलेश पंडित (35, डावखोल संगमेश्वर तालुका), निलेश पंडीत (42, डावखोल संगमेश्वर तालुका), अनिता संतोष सावंत (55, सावंतवाडी) निशिकांत शशिकांत जाधव (23, हेदवी गुहागर तालुका), कांचन काशिनाथ शिर्के (50, आबिटगांव, ता. चिपळूण), मुद्रा निलेश पंडीत  (12, डावखोल संगमेश्वर तालुका), लाड (वय 58, डावखोल,संगमेश्वर तालुका) अशी नावे आहेत. दरम्यान, या अपघातात चार वर्षीय मुलगा वाचला होता. परंतु जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्‍यान मृत्यू झाला.

-हेही वाचा 

इंदापूर : निवडणूक पुढे ढकलल्याने जनतेचे नुकसान; खा. सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन

स्वप्नात झाला दृष्टांत अन् प्रार्थनास्थळावर फडकला ध्वज, पाकिस्तानचा झेंडा समजून गावात उडाली खळबळ

परभणी : लग्नपत्रिकेसोबत पुस्तक भेट, गंगाखेडच्या जामगे परिवारांचा अनोखा उपक्रम

Back to top button