नगर : वडगाव पान फाट्यावरील वेश्या व्यवसायावर छापा | पुढारी

नगर : वडगाव पान फाट्यावरील वेश्या व्यवसायावर छापा

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यात वडगाव पान येथे साईमाया लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. श्रीरामपूर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. या छापेमारीमध्ये दोघा जणांना अटक करण्यात आली आहे व एक महिला आरोपी फरार आहे. तसेच ४१ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचबरोबर एका महिलेची सुटका या कुंटणखाण्यातून करण्यातून करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील वडगाव पान फाट्या जवळ साईमाया लॉज या ठिकाणी अवैधरित्या वेश्या व्यवसाय सुरू होता. याबाबतची गुप्त माहिती श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. यानुसार तालुका पोलिसांनी आपल्या पथकासह वडगाव पान शिवारात सापळा रचून छापेमारी केली. या छापेमारीत प्रतिक बाळासाहेब चत्तर (रा. वडगाव पान), ) व खेमराज कृष्णाराज उपाध्याय (रा. वडगाव पान, ता. संगमनेर अशा दोघा जणांना अटक करण्यात आले असून एक महिला आरोपी फरार आहे. तसेच काही वस्तूसह ४१ हजार २० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. साईमाया लॉज येथे सुरु असलेल्या वेश्या व्यावसायातून एका महिलेची सुटका करण्यात आली.

याबाबत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू आहेर यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून, पोलिसांनी प्रतिक बाळासाहेब चत्तर, पुनम उर्फ सुजाता संजय आगरे आणि खेमराज कृष्णाराज उपाध्याय (रा. वडगाव पान, ता. संगमनेर) या तिघांवरती अनैतिक व्यापारास प्रतिबंध या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे हे करत आहे.

हेही वाचा

Back to top button