पुणे : एमएचटी-सीईटी 9 ते 20 मे दरम्यान; सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर | पुढारी

पुणे : एमएचटी-सीईटी 9 ते 20 मे दरम्यान; सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) आगामी 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार इंजिनिअरिंग, फार्मसी, अ‍ॅग्रिकल्चरच्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी होणारी एमएचटी-सीईटी परीक्षा 9 ते 20 मे दरम्यान होणार आहेत. त्याचप्रमाणे एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी होणारी सीईटी 18 आणि 19 मार्चला होण्याची शक्यता आहे, तर एमसीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीची सीईटी 25 आणि 26 मार्चला होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सीईटी सेलने आगामी शैक्षणिक वर्षात विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी होणार्‍या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करण्याबाबत पुरेशी कल्पना मिळणार आहे. या वेळापत्रकानुसार हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश होणारी ’बीएचएमसीटी’ सीईटी 20 एप्रिलला, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची एमएचएमसीटी सीईटी 30 एप्रिलला होणे अपेक्षित आहे.

त्याचप्रमाणे बी-प्लॅनिंग सीईटी 23 एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे. बी-डिझाइन सीईटी 30 एप्रिलला; तसेच आर्किटेक्चरच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेशासाठीची सीईटीही 30 एप्रिलला होण्याची शक्यता आहे. हे वेळपत्रक संभाव्य असल्याने, त्यात बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार्‍या वेळापत्रकानुसार तयारीचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button