Rohit Sharma in the Gym : वनडेसाठी ‘हिटमॅन’ तयार! रोहितचा नवा व्हिडीओ पाहिलात का? (Video) | पुढारी

Rohit Sharma in the Gym : वनडेसाठी 'हिटमॅन' तयार! रोहितचा नवा व्हिडीओ पाहिलात का? (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघ सध्या मायदेशात श्रीलंकेविरोधात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळवण्यात येणार आहे. जखमी रोहित शर्माच्या अनुपस्थित टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याने केले. दरम्यान, वनडे सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. बांगलादेश विरूद्धच्या सामन्‍यावेळी जखमी झाल्यानंतर तो पुनरागमन करणार आहे. त्यासाठी हिटमॅन रोहित शर्माने जय्यत तयारी सुरू केली आहे. रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रोहित जीममध्ये व्यायाम आणि डान्स करताना दिसत आहे. (Rohit Sharma in the Gym)

रोहितच्या पोस्टवर रीतिकाने दिली प्रतिक्रिया

व्यायामासोबत रोहितने जीममध्ये डान्सही केला आहे.  व्हिडिओ शेअर करताना त्‍याने कॅप्शनही लिहले आहे. ‘वही करे जो आपको मुस्कान दे’ असे कॅप्शन त्याने व्हिडीओला दिले आहे. तर रोहितची पत्नी रीतिका हिने या व्हिडिओला प्रतिक्रिया दिली आहे. तिने दोन इमोजी पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली. (Rohit Sharma in the Gym)

रोहित शर्माने बांगलादेशविरोधातील एकदिवसीय मालिका खेळली होती. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे तो सलामीला फलंदाजी करण्यास आला नव्हता. भारताने सात विकेट गमावल्‍यानंतर तो मैदानात उतरला होता. जखमी अवस्थेतही रोहितने अर्धशतक झळकावले होते. (Rohit Sharma in the Gym)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

हेही वाचा : 

Back to top button