पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि श्रीलंकेदरम्यान मालिकेतील अंतिम सामना शनिवारी (दि. ७) सौराष्ट्र, गुजरातच्या मैदानावर खेळवण्यात येईल. भारताने मायदेशात आजवर श्रीलंकेविरुद्ध एकही टी-20 मालिका गमावलेली नाही. मुंबईत खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला २ धावांनी पराभूत केले होते. तर गुरुवारी पुण्याच्या 'एमसीए' स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यात श्रीलंकेने भारताचा १६ धावांनी पराभूत करत १-१ ने बरोबरी केली होती. (IND vs SL Playing-11)
भारत आणि श्रीलंकामध्ये ही सातवी टी-20 मालिका आहे. ७ मालिकेतील ४ मालिका भारताने आपल्या नावावर केल्या आहेत. एक मालिका भारताला गमवावी लागली होती. एक मालिका अनिर्णित राहिली होती. मायदेशात भारताने श्रीलंकेविरुद्ध एकही मालिका गमावलेली नाही. अंतिम सामन्यात विजय मिळवण्यासाठी गेल्या भारतीय फलंदाजांना गुजरातच्या सपाट खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे. सोबतच वेगवान गोलंदाजांना भेदक मारा करावा लागणार आहे. (IND vs SL Playing-11)
तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघात ईशान किशन सोबत ऋतुराज गायकवाड सलामीला फलंदाजीला येऊ शकतात. शुभमन गिलने श्रीलंकेच्या विरोधात आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पदार्पण केले होते. मात्र, शुभमनला सुरूवातीच्या दोन्ही टी-20 सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्याने पहिल्या टी-20 सामन्यात ७ तर दुसऱ्या टी-20 सामन्यात केवळ ५ धावा केल्या. अशातच शुभमन गिलच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते.
भारतीय संघाच्या मध्यक्रमाचा विचार केला असता सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी आणि दीपक हुड्डाचे स्थान पक्के मानले जात आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात दिमाखदार फटकेबाजी केली होती. हार्दिक आणि दीपकने पहिल्या टी-20 सामन्यात चांगली कामगिरी केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. पदार्पण करणाऱ्या राहुल त्रिपाठीने फटकेबाजीही केली होती. त्यामुळे तिसऱ्या टी २० सामन्यात त्याला संधी मिळू शकते.
उमरान मलिकने तिसऱ्या टी-20 सामन्यात भेदक मारा केला होता. आजच्या सामन्यात हर्षल पटेल पुनरागमन करू शकतो. अर्शदीपने दुसऱ्या टी-20 सामन्यात पाच नो बॉल टाकले होते. याशिवाय शिवम मावी उमरान मलिकसोबत गोलंदाजी करताना दिसू शकतो. तर युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांच्यावर फिरकीची जबाबदारी देण्यात येईल.
हार्दिक पंड्या (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, हर्षल पटेल (IND vs SL Playing-11)