उंडवडी : दूषित हवामानामुळे ज्वारी पिकावरही करपा | पुढारी

उंडवडी : दूषित हवामानामुळे ज्वारी पिकावरही करपा

उंडवडी(ता. बारामती); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जिरायती भागात यंदा अतिपावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरण्या काही भागांत उशिरा झाल्या. त्या पेरण्या झालेल्या ज्वारीची पिके पिवळी पडू लागली आहेत, तर माळरानावरील कमी पाण्यामुळे पिके सुकू लागली आहेत. काही ठिकाणी ज्वारीवर करपा रोग पडू लागला आहे.

यंदा थंडी कमी पडल्यानेही पिकांच्या वाढीवर दुष्परिणाम जाणवत आहे. सतत वातावरणात बदल होत आहे. अचानक ढगाळ वातावरण, तर उष्णता जाणवत आहे. कधी थंड व दूषित हवा निर्माण होत असल्याने याचा पिकांवर दुष्परिणाम दिसत आहे. ज्वारीच्या पिकांवर करपा पडू लागला आहे. पाने करपू लागल्याने वाढही खुंटली असल्याने शेतकर्‍यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Back to top button