Tripura : त्रिपुराच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरात आलेल्या पुजाऱ्यांवर हल्ला, वाहनांची तोडफोड | पुढारी

Tripura : त्रिपुराच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरात आलेल्या पुजाऱ्यांवर हल्ला, वाहनांची तोडफोड

पुढारी ऑनलाईन डेस्क : त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या वडिलांच्या घराच्या बाहेर मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात लोकांनी पुजाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. तसेच वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना जेव्हा घडली तेव्हा पुजारांचा समुह देब यांच्या राजधानगर येथील घरात आले होते. हे पुजारी बुधवारी (दि.४) बिप्लब कुमार देब यांच्या वडिलांच्या श्राद्धानिमित्त विधी करण्यासाठी आले होते. (Tripura)

Tripura : मारहाण आणि वाहनांची तोडफोड

माहितीनुसार, एका अज्ञात समूहाने या पुजाऱ्यांवर हल्ला केला. त्याचबरोबर त्यांच्या वाहनांची तोडफोडही करण्यात आली आहे. आजूबाजूच्या लोकांनी आणि स्थानिक लोकांनी पुजाऱ्यांना वाचवले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. नुकसान झालेल्या वाहनाचे मालक जितेंद्र कौशिक यांनी सांगितले की, मी त्रिपुरा सुंदरी मंदिराच्या दर्शनासाठी आलो होतो. बुधवारी होणाऱ्या यज्ञाची तयारी पाहण्यासाठी मी माझ्या गुरुदेवांच्या सूचनेनुसार येथे आलो होतो. अचानक एक जमाव आला, त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि माझ्या वाहनाची तोडफोड केली.

स्थानिकांनी या घटनेचा निषेध केला आहे. दरम्यान, यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी निरुपम देबबर्मा आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक देबांजना रॉय घटनास्थळी पोहोचले.

हेही वाचा

Back to top button