First Indian Woman Officer : जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीनवर पहिल्या महिला अधिकारीची नियुक्ती | पुढारी

First Indian Woman Officer : जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीनवर पहिल्या महिला अधिकारीची नियुक्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याची जगातील सर्वात उंच युद्धभूमी असणाऱ्या सियाचीन येथे नियुक्ती करण्यात आली आहे. या महिला अधिकारी भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सची कॅप्टन शिवा चौहान या आहेत. कॅप्टन चौहान यांची ३ जानेवारीपासून कुमार पोस्टवर तीन महिन्यांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. (First Indian Woman Officer)

फायर अँड फ्युरी कॉर्प्स यांनी ट्विटरवर एक पोस्ट करुन कॅप्टन शिवा चौहान यांच्या या पोस्टिंगबद्दल माहिती दिली. त्यांच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “ब्रेकिंग द ग्लास सीलिंग, फायर अँड फ्युरी सॅपर्सचे कॅप्टन शिवा चौहान जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीनमधील कठोर प्रशिक्षण पूर्ण करुन कुमार पोस्टवर रुजू झाल्या आहेत.” असे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत.” (First Indian Woman Officer)

कॅप्टन चौहान आणि इतर जवानांची राष्ट्रध्वजासह काही छायाचित्रेही ट्विटरवरील पोस्टमध्ये शेअर केली आहेत. लष्कराच्या उधमपूर येथील ही सर्व छायाचित्रे आहेत.

सियाचीन ग्लेशियर जगातील सर्वोच्च लष्करी युद्धक्षेत्र

काराकोरम रेंजमध्ये सुमारे २०,००० फूट उंचीवर असलेले सियाचीन ग्लेशियर हे जगातील सर्वोच्च लष्करी युद्धक्षेत्र म्हणून ओळखले जाते. याठिकाणी सैनिकांना जोरदार बर्फवृष्टी आणि जोरदार वाऱ्याचा सामना करावा लागतो. याआधी, महिला अधिकार्‍यांना सियाचीन बेस कँम्पवर तैनात करण्यात आले होते. हा बेस कँप सुमारे 9,000 फूट उंचीवर आहे.

हेही वाचा

Back to top button