नगर : अवैध गॅस रॅकेटवर कोपरगाव पोलिसांचा छापा; २७ लाखहून अधिकचा साठा जप्त | पुढारी

नगर : अवैध गॅस रॅकेटवर कोपरगाव पोलिसांचा छापा; २७ लाखहून अधिकचा साठा जप्त

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : अवैधरित्या टँकर मधून गॅस काढून घेणाऱ्या रॅकेटचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर यांच्या पथकाने या टोळीला रंगेहाथ पकडत ही कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पोलीस पथकाने मंगळवारी (दि.०३) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अवैधरित्या  टॅँकरमधून गॅस काढणाऱ्या रॅकेटवर छापा टाकला. कोपरगाव शहरातील संगमनेर ते कोपरगाव रोड मार्गावरील जेऊर कुंभारी शिवारातील या रॅकेटवर पोलिसांनी कारवाई केली. टँकरमधील (क्र. एम.एच.४३ बी.जी.७१५०) गॅस काढून दुसऱ्या एका वाहनामध्ये (क्र. एम.एच.११ सी.एच.४४८०) भरत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ३० गॅसच्या टाक्या भरतील असा सुमारे २७ लाख ९७ हजार ७१८ रुपयांचा गॅस साठा जप्त करण्यात आला. यातील आरोपी बुधाराम आनंदाराम विष्णोई (वय ४०), याव्यतिरिक्त राजस्थानमधील पाच आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या रॅकेटमध्ये कोण सहभागी आहेत याचा पोलीस अधिक तपास घेत आहेत.

हेही वाचा

Back to top button