परभणी : घराला लागलेल्या आगीत जीवनावश्यक साहित्य जळून खाक | पुढारी

परभणी : घराला लागलेल्या आगीत जीवनावश्यक साहित्य जळून खाक

चारठाणा : पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे सेवालाल नगर भागातील एका राहत्या घराला शॉट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जीवनावश्यक साहित्यासह दुचाकी जळून खाक झाली. ही घटना सोमवारी (दि.२) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. नुकसान भरपाई मिळण्याबाबत तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील रहिवासी लक्ष्मण विठ्ठल राठोड यांच्या घराला सोमवार रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत संसारोपयोगी व जीवनावश्यक वस्तू तसेच एक मोटारसायकल जळून खाक झाली. लाकडी घर असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आजूबाजूच्या नागरिकांनी आग आटोक्यात आणली. परंतु घरातील सर्वच इले्ट्रॉनिक्स वस्तू, संसारोपयोगी वस्तू, मोटरसाकल असे ऐकून १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button