New Year 2023 celebrations | नवीन वर्षाचा जल्लोष, ‘स्विगी’वरून ३.५० लाख बिर्याणीची ऑर्डर फस्त, पिझ्झा, चिप्स आणि बरंच काही…. | पुढारी

New Year 2023 celebrations | नवीन वर्षाचा जल्लोष, 'स्विगी'वरून ३.५० लाख बिर्याणीची ऑर्डर फस्त, पिझ्झा, चिप्स आणि बरंच काही....

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज १ जानेवारी रोजी २०२३ वर्षाची सुरुवात झाली. त्याआधी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नवीन वर्षाचे देशभरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. काहींनी पार्ट्यांमध्ये आनंद लुटला. तर काहींनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ऑनलाइनद्वारे खाद्यपदार्थ मागवले. दरम्यान, फूड डिलिव्हरी अॅप स्विगीने (Food delivery app Swiggy) शनिवारी रात्री १०.२५ पर्यंत ३.५० लाख बिर्याणी (Biryani) ऑर्डर दिल्या आणि तर देशभरात ६१ हजार पेक्षा जास्त पिझ्झा पुरवले, अशी कंपनीच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. (New Year 2023 celebrations)

तसेच स्विगीने ट्विटरवर एक सर्व्हे केला. ज्यामध्ये युजर्सना वोट करून सांगायचे होते की कोणत्या प्रकारच्या बिर्याणीची सर्वात जास्त ऑर्डर केली. ट्विटरवर केलेल्या सर्वेक्षणानुसार, हैदराबादी बिर्याणीसाठी ७५.४ टक्के ऑर्डर आल्या. त्यानंतर लखनौ बिर्याणी १४.२ टक्के आणि कोलकाता बिर्याणीच्या १०.४ टक्के ऑर्डर आल्या. ३.५० लाख ऑर्डरसह बिर्याणी ही ऑर्डर दिलेल्या सर्व पदार्थांमध्ये टॉपवर होती, असे सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

हैद्राबादमधील बावर्ची हे सर्वाधिक बिर्याणी विक्री करणाऱ्या रेस्टॉरंटपैकी एक होते. या रेस्टॉरंटमधून २०२१मधील नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रत्येक मिनिटाला दोन बिर्याणी वितरीत केल्या होत्या आणि ३१ डिसेंबर २०२२ रोजी खवय्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी या रेस्टॉरंटसने १५ टन बिर्याणी तयार केली होती.

६१,२८७ पिझ्झा वितरित

”डॉमिनोजचो ६१,२८७ पिझ्झा वितरित केले. आम्ही फक्त त्यांच्यासोबत किती पॅकेट्स जातील याची कल्पना करू शकतो,” असे स्विगीने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यात असेही म्हटले आहे की शनिवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चिप्सची १.७६ लाख पॅकेट स्विगी इन्स्टामार्टवर ऑर्डर करण्यात आली होती. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रात्री ९.१८ पर्यंत देशभरात सुमारे १२,३४४ लोकांनी खिचडीची ऑर्डर दिली होती. (New Year 2023 celebrations)

हे ही वाचा :

Back to top button