देशातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या ३ हजार ५५२ वर | पुढारी

देशातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या ३ हजार ५५२ वर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  सरत्या चोवीस तासांत कोरोना रुग्णसंख्येत 268 ने वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी देण्यात आली. तत्पूर्वीच्या दिवशी रुग्णसंख्येत 188 ने वाढ झाली होती. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 552 वर पोहोचली आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण 0.01 टक्के इतके आहे.

मागील चोवीस तासांत कोरोनामधून 182 लोक बरे झाले. यानंतर बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4 कोटी 41 लाख 43 हजार 665 वर गेली आहे. रिकव्हरी दर 98.80 टक्क्यांवर स्थिर आहे. दरम्यान गत एका दिवसात 2 लाख 36 हजार 919 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. याशिवाय 99 हजार 231 डोसेस देण्यात आले आहेत. दरम्यान कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत 220.08 कोटी डोसेस देण्यात आले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

        हेही वाचलंत का ?

Back to top button