राज्यात 34 हजार ऑक्सिजन बेड; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज

राज्यात 34 हजार ऑक्सिजन बेड; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन पूर्वतयारीचा भाग म्हणून राज्यातील द्वितीय आणि तृतीय स्तरावरील 1436 आरोग्य संस्थांचे मॉकड्रील बुधवारपर्यंत पार पडले. कोरोनासाठी सध्या 34 हजार ऑक्सिजन बेड, तर 27 हजार डॉक्टरांचे मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात आले आहे.

मॉकड्रील यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विभाग आणि जिल्हास्तरावर नोडल अधिका-यांची नेमणूक केली होती. रुग्णालयांमधील उपलब्ध खाटा, आयसीयू सुविधा, यंत्रसामग्री, ऑक्सिजन सुविधा, औषधसाठा, मनुष्यबळ, टेलिमेडिसीन या सर्व सुविधांचा आढावा घेण्यात आला. राज्यात 619 शासकीय आणि 744 खासगी रुग्णालये, 28 शासकीय आणि 30 खासगी वैद्यकीय महाविद्यालये, 15 इतर रुग्णालये अशा 1436 आरोग्य संस्थांमध्ये मॉकड्रील पार पडले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news