बीड : लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी हिंदू समाजाचा मुकमोर्चा | पुढारी

बीड : लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी हिंदू समाजाचा मुकमोर्चा

केज; पुढारी वृत्तसेवा : लव्ह जिहाद व धर्मांतरण रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, या मागणीसाठी केज येथे आज (दि.२८) समस्त हिंदू समाजाच्या वतीने भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. शहरातील भवानीमाता मंदिर येथून मोर्चाला सुरूवात झाली. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार दुलाजी मेंढके यांना देण्यात आले.

देशात हिंदू धर्माविषयीच्या द्वेषभावनेतून हिंदू मुलींना प्रेमाचे नाटक करून, फसवणूक करून पळवून नेणे व नंतर धर्मांतरण करण्यासाठी दबावतंत्राचा वापर करणे, त्यांच्या हत्या करणे, अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली अनेक तरुणींना फसवून हत्या केली जाते, अशा गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी. अशी मागणी निवेदानातून करण्यात आली. या मोर्चात हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. भवानीमाता मंदिर येथून निघालेला मोर्चा धारूर चौक मेन रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात धडकला. यावेळी ॲड तुकारामजी चिंचणीकर म्हणाले की, देशात लव्ह जिहादच्या सातत्याने घटना घडत आहेत. अशा घटनांना आळा घातला पाहिजे. प्रत्येक हिंदू बांधवाने आपल्या माता भगिनींचे सोशल मीडियावर अकाऊंट असेल तर ते बंद केले पाहिजे, असे ते म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button