पुढारी वृत्तसेवा : जगभरातील बँका सोने का विकत घेत आहेत, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. त्याचे कारण म्हणजे डॉलरची वाढलेली ताकद आणि वाढती महागाई. जेव्हा महागाई वाढते तेव्हा चलनाचे मूल्य कमी होऊ लागते. याशिवाय अनिश्चिततेच्या काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोन्याचा साठा राखीव ठेवला जातो.