छत्तीसगड : १५ वर्षांच्या विद्यार्थिनीचे अपहरण, हरियाणात विक्रीनंतर अत्याचार; ७ जणांना अटक | पुढारी

छत्तीसगड : १५ वर्षांच्या विद्यार्थिनीचे अपहरण, हरियाणात विक्रीनंतर अत्याचार; ७ जणांना अटक

रायपूर; पुढारी ऑनलाईन : छत्तीसगडमधून १५ वर्षांच्या विद्यार्थिनीचे शाळेला जात असताना तिचे अपहरण केले. यानंतर त्या मुलीला हरियाणात विकले व विकत घेणाऱ्याने त्या पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन महिलांसह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन महिन्यांपूर्वी कोरिया जिल्ह्यातील (छत्तीसगड) पटना पोलिस ठाण्यात अल्पवयीन युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदविण्यात आली होती. हरियाणा येथील सोनीपतमधून पीडित मुलीची पोलिसांनी सुटका केली.

या प्रकरणी कोरिया येथील पोलिस उपाधीक्षक कविता ठाकूर यांनी सांगितले की, पीडित मुलगी ११ ऑक्टोंबर रोजी आपल्या कुटुंबासमवेत दसरा उत्सव पाहण्यास गेली असताना तिचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी फिर्याद नोंदवत पोलिसांनी उपाधीक्षक कविता ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली तपास सुरु केला. तपासा दरम्यान अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पीडित मुलीचा ठाव ठिकाणा समजताच पोलिस हरियाणाला रवाना झाले.

ठाकूर यांनी पुढे सांगितले की, पीडित मुलीचे अपहरण करण्यात आले व नंतर तिला एका ३५ वर्षाच्या व्यक्तीला विकले गेल्याचे तपासात समोर आले. तसेच खरेदी करणाऱ्याने त्या मुलींवर वारंवार अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी सोनीपत येथून एका व्यक्तींसह दोन महिलांना तर आणखी चार जणांना छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांचा पीडितेचे अपहरण करणे आणि तिची विक्री करणे यामध्ये सहभाग होता. या सर्वांवर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पटना पोलिस करत आहेत.

अधिक वाचा :

Back to top button