Jhume Jo Pathan song : 'झुमे जो पठाण' दुसरं गाणं रिलीज, शाहरूख-दीपिकाचा बोल्ड अंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : (Jhume Jo Pathan song) अभिनेता शाहरूख खान याच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटाचा वाद अद्याप संपलेला नाही. तोवर चित्रपटातील दुसरे गाणे ‘झूमे जो पठान’ रिलीज झालं आहे. या चित्रपाटील ‘बेशरम रंग’ हे गाणं दीपिकाच्या वेशभूषेमुळे वादाच्या भोवऱ्यात आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Jhume Jo Pathan song)
‘झूमे जो पठान’ हे दुसरं गाणं आज (दि. १८) रिलीज झालं. या गाण्यातही दीपिका आणि शाहरूख बोल्ड अंदाजात दिसत आहेत. याआधी ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅप्पी न्यू इअर’ असे लोकप्रिय चित्रपट दिल्याने दीपिका – शाहरूख ही जोडी पडद्यावर हिट ठरली आहे. त्यामुळे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर तुफान चर्चेत येत आहे.
‘झुमे जो पठान’ हे पठाण चित्रपटातील नव गाणं एक पार्टी साँग (party song) आहे. या गाण्यात शाहरूख आणि दीपिकाची धमाकेदार केमिस्ट्री चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. या गाण्याला अरिजित सिंग, सुकृति कक्कर आणि विशाल शेखर यांनी आवाज दिला आहे तर संगीतकार विशाल-शेखर यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. ‘बेशर्म रंग’ या गाण्याची कोरिओग्राफर वैभवी मर्चंट होती. या गाण्याला बॉस्को आणि सीझरच्या जोडीने कोरिओग्राफ केले आहे. हे गाणं कानावर पडताच चाहत्यांचे पाय थरकू लागतील एवढं मात्र नक्की!
हेही वाचा :
- दिशा सालियनच्या मृत्यूची होणार एसआयटी चौकशी; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा
- Vaani Kapoor : इश्शsss❤️; जाळीदार ड्रेसमध्ये वाणीने सर्वांची केली बोलती बंद
- Sonalee Kulkarni : एवढं Hot 🔥 कोण दिसत yrr😍