Jacqueline Fernandez : विदेशात जाण्याची परवानगी याचिका जॅकलीनने घेतली मागे | पुढारी

Jacqueline Fernandez : विदेशात जाण्याची परवानगी याचिका जॅकलीनने घेतली मागे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित हवाला प्रकरणात अडकलेली सिनेअभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ( Jacqueline Fernandez ) हिने विदेशात जाण्यास परवानगी देण्याच्या विनंतीची याचिका मागे घेतली आहे. बहारिन येथे आपले कुटुंबीय राहत असून, त्यांना भेटण्यासाठी परवानगी दिली जावी, अशी याचिका अलिकडेच जॅकलीनने न्यायालयात दाखल केली होती.

दोषारोप दाखल करण्यासंदर्भातला निर्णय आधी होऊ दे, त्यानंतर तुमच्या अर्जावर विचार केला जाईल, असे न्यायालयाकडून जॅकलीनला सुनावण्यात आले होते. त्यानंतर जॅकलीनने ही याचिका मागे घेतली. जॅकलीन ही बॉलिवूडची अभिनेत्री असली तरी ती विदेशी नागरिक आहे. जर ती भारताततून परदेशात गेली तर ती भारतात कधीच परतणार नाही, असे सांगत सक्तवसुली संचलनालयाने जॅकलीनच्या विदेश दौऱ्याला विरोध केला होता.

हेही वाचा :  

Back to top button