नंदुरबार : फायनान्स कंपनीला ३ कोटी ७२ लाखांचा गंडा, 9 जणांविरोधात गुन्हा | पुढारी

नंदुरबार : फायनान्स कंपनीला ३ कोटी ७२ लाखांचा गंडा, 9 जणांविरोधात गुन्हा

नंदुरबार : खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना शासकीय योजनेचा लाभ देण्याची थाप मारून खोटे कागदपत्र सादर करीत शहरातील मुथुट मायक्रो फायनान्स कंपनीची ३ कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी. पोलिसात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील हाट दरवाजा भागात मुथुट मायक्रो फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या ठिकाणाहून आरोपींनी नंदुरबार तालुक्यातील विविध गावांमधील अशिक्षित व गरीब महिलांना शासनाकडून ५ हजार रुपयांचा परतावा मिळणार असल्यांचे खोटे आमिष दाखवून कागदपत्रे घेत त्यांच्या नावाने कर्ज मंजूर करून घेतले होते. दरम्यान त्यांनी कर्जदारांना कर्जाची रक्कम न देता परस्पर हडप केली होती. ही रक्कम एकूण ३ कोटी ७२ लाख, २ हजार ९१४ रुपयांच्या घरात आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी कंपनीचे झोनल मॅनेजर अंकुश सिंग कृष्णकुमार सिंग गहलोद यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश भालेराव, शिलाबाई सोनवणे, सुशीला पाडवी, हिराबाई चौरे, कल्पना वळवी, नामदेव वळवी, भुरीबाई भि रुखसान शेख व जाहिदा नामक महिला यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button