परिंचे : पांगारेत शेतकर्‍यांनी बांधले चार वनराई बंधारे | पुढारी

परिंचे : पांगारेत शेतकर्‍यांनी बांधले चार वनराई बंधारे

परिंचे (ता.पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : पांगारे येथील शेतकर्‍यांनी संघटीत होऊन कृषी विभागाच्या मदतीने चार ठिकाणी वनराई बंधार्‍यांची निर्मिती केली आहे. ओढ्या लगतच्या विहीरीना याचा फायदा होणार असल्याचे कृषी सहाय्यक स्वप्नाली चौंडकर यांनी सांगितले.
आहे यावेळी कृषी मित्र सचिन शेलार व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

रब्बी हंगामातील पीकांना शेवटची पाण्याची पाळी देताना पाण्याची कमतरता पडते. उत्पादनात घट होत असल्यामुळे परिसरातील ओढ्यावर वनराई बंधार्‍यांने हा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात सोडवण्याच्या उद्देशाने कृषी विभागाच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना शेतकर्‍यांना सांगण्यात आली. शेतकर्‍यांनी श्रमदानातून चिंदरा ओढ्यावर बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. कृषी पर्यवेक्षक संदीप कदम व कृषी सहायक स्वप्नाली चौंडकर यांनी तांत्रिक माहिती देऊन प्रोत्साहन दिले.

वनराई बंधार्‍यामुळे लगतच्या विहिरींची पाणी पातळी वाढून त्याचा रब्बी पिकांना उपयोग होणार असल्याचे महादेव शेलार यांनी सांगितले. जनावरांना तसेच जंगली जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार असल्याचे उमेश शेलार यांनी सांगितले. पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शेतकर्‍यांसाठी हे बंधारे लाभदायक ठरतील असे मत स्वप्नाली चौंडकर यांनी व्यक्त केले. उपक्रमासाठी दत्तात्रय शेलार,रामराव शेलार,हेमंत शेलार, त्रिंबक शेलार, भरत शेलार, महादेव शेलार व इतर शेतक-यांनी श्रमदान करून बंधारे बांधले.

Back to top button