सातारा : शहीद जवान सोमनाथ मांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सातारा ; पुढारी वृत्तसेवा : शहीद जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर आज (सोमवार) आसले ता. वाई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान सोमनाथ मांढरे यांचा मुलगा यश यांनी वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.
यावेळी सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, माजी आमदार मदन भोसले, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, वाई पंचायत समितीच्या सभापती संगिता चव्हाण यांनी शहिद जवान सोमनाथ मांढरे यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.
- Charanjit Singh Channi : पंजाबच्या नव्या ‘कॅप्टन’चा शपथविधी; काँग्रेसने एका दगडात मारले तीन पक्षी!
- #KiritSomaiya : किरीट सोमय्या अखेर माघारी फिरले, कराडमधून मुंबईकडे रवाना
जवान सोमनाथ मांढरे यांची आसले गावातून लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. ‘अमर रहे अमर रहे सोमनाथ मांढरे अमर रहे, भारत माता की जय,’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहचली.
- किरीट सोमय्यांच्या केसाला धक्का लागल्यास सरकार पडेल : सदाभाऊ खोत
- हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार, सोमय्या यांचे आव्हान
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार पाटील, अपर जिल्हाधिकारी शिंदे यांनी मांढरे यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले. पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली.
- Kirit Somaiya : ‘मुश्रीफांविरोधातील ईडी चौकशीच्या भितीने माझ्यावर कारवाई!’
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ : बच्चन यांच्याकडून विनोदवीरांना कौतुकाची थाप
यानंतर भाऊ राहूल, पत्नी प्रियंका, मुलगा यश व मुलगी आराध्या (वय 10 महिने) यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. शहीद सोमनाथ मांढरे यांचा मुलगा यश यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.