किरीट सोमय्यांच्या केसाला धक्का लागल्यास सरकार पडेल : सदाभाऊ खोत | पुढारी

किरीट सोमय्यांच्या केसाला धक्का लागल्यास सरकार पडेल : सदाभाऊ खोत

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीची ही तालीबानी वृत्ती चालू देणार नाही. किरीट सोमय्या यांच्यास केसाला धक्का लागल्यास महाराष्ट्रातील सरकार पडेल, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यापासून रोखले. त्यांना रोखायला राष्ट्रवादी पक्षाच्या गुंडांकडून त्यांना खुली धमकी देण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार हे राज्य तुम्ही गुंडांची टोळी म्हणून चालवत् आहात का? मविआ सरकारने लक्षात असू द्यावे की, उद्या सोमय्या यांच्या केसाला जर धक्का लागला तर त्याच क्षणी महाराष्ट्र राज्यामध्ये हे सरकार बरखास्त झालेले असेल, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला.

तूर्त संघर्ष टळला, पण कागलमध्ये कडक बंदोबस्त

दरम्यान, सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर सोमय्या कागल येथे येणार होते. मात्र, त्यांना कराड येथेच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे होणारा संघर्ष तूर्त तरी टळला आहे. पण तरीही कागल बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगला. त्यानंतर सोमवारी त्यांनी कागलला येणार असल्याचे जाहीर केले होते. यावेळी मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार विरोध करून प्रत्युत्तर देण्यासाठी जय्यत तयारी केली होती.

हेही वाचलं का ? 

Back to top button