पारगाव; पुढारी वृत्तसेवा: सशाची शिकार करताना बिबट्याने दुधविक्रेता दुचाकीस्वाराला धडक दिली. सशाची शिकार करताना बिबट्याने दुचाकीस्वाराला धडक देण्याची घटना नागापूर (ता. आंबेगाव) येथे रविवारी (दि. १९) सायंकाळी सात घडली. नितीन बाळासाहेब म्हस्के असे जखमीचे नाव आहे.या घटनेमुळे नागापूर गावातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
नागपूर ते थापलिंग रस्त्यावर माडीवाल्यांच्या घराच्या पश्चिमेला नागेश्वर देवस्थानची जमीन आहे . रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास तेथून नितीन म्हस्के हे दूध घालण्यासाठी गावाकडे चालले होते. त्यावेळी बिबट्या सशाचा पाठलाग करताना उसाच्या शेतातून अचानक ससा बाहेर आला आणि त्याच्यावर बिबट्याने झडप मारली.
ससा दुचाकी खालून पलिकडे गेला. बिबट्याची धडक नितीन मस्के यांच्या गाडीला बसली. ते बाजूला फेकले गेले. बिबट्याने सशावर झडप घातली. या घटनेत गवळी नितीन मस्के जखमी झाले. ग्रामस्थ नितीन म्हस्के यांच्या मदतीला धावले यावेळी त्यांची दुचाकी बाजूला केली असता मृत ससा आढळून आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी नितीन म्हस्के यांची विचारपूस केली.
वनक्षेत्रपाल स्मिता राजहंस यांना पिंजरा लावण्याची मागणी केली. या घटनेमुळे नागापूर गावातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
"बिबट्या शिकारीसाठी सशाचा पाठलाग करत होता. त्या हल्ल्यात ससा वाचला असता तर बिबट्याने मलाच ठार केले असते. मी माझा मृत्यू माझ्या डोळ्यांनी पाहिला ."
नितीन म्हस्के
हेही वाचलं का?