Kirit Somaiya : 'मुश्रीफांविरोधातील ईडी चौकशीच्या भितीने माझ्यावर कारवाई!' - पुढारी

Kirit Somaiya : 'मुश्रीफांविरोधातील ईडी चौकशीच्या भितीने माझ्यावर कारवाई!'

कराड; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूरला जात असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना आज (सोमवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड पोलिसांनी कराड रेल्वे स्थानकावर रोखले. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी चौकशीच्या भितीने माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला आहे.

मला घरात कोंडून ठेवलं. पण ठाकरे सरकारचा हा उद्धवटपणा चालू देणार नाही, अशा इशारा सोमय्यांनी दिला आहे. मला कोल्हापूरला जाण्यास बंदी का? असा सवाल त्यांनी केला. पवारांच्या मार्गदर्शनाशिवाय हे होऊच शकणार नाही, असेही ते म्हणाले.

सहा तास कोंडून ठेवून मला गणेश विसजर्नापासून वंचित ठेवण्यात आले. गनिमीकाव्याने सोमय्यांवर हल्ला करणार ही माहिती का लपवली?. कागल पोलिस स्टेशनमध्ये पुराव्यांसह तक्रार देणार होतो. पण मला वाटेतचं अडवलं. हसन मुश्रीफ यांच्यामुळे मला आंबेमातेचं दर्शन घेता आला नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

लवकरच मी कागलमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.

हसन मुश्रीफ यांनी आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला आहे. हा मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा असून याबाबत मुंबई ईडी आणि आयकरकडे कागदपत्रे सुपूर्द करणार असल्याचे सोमय्या म्हणाले.

पुढच्या आठवड्यात तिसरा घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांनी मी घाबरत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

जिवाला धोका असल्याचे सांगितल्याने कराडमधून माघारी फिरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जात असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी कराड रेल्वे स्थानकावर रोखले. यानंतर किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली होती. ”पोलिसांनी मला निषेधाच्या आदेशान्वये कराडलं थांबवले.

कराड सर्किट हाऊसला मी पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार आहे,” असे आव्हान सोमय्या यांनी दिले होते.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेले १२७ कोटींच्या घोटाळ्याचे गंभीर आरोप, त्यावर मुश्रीफ यांनी १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा दिलेला इशारा आणि त्याचबरोबर सोमय्या यांच्याविरोधात मंत्री मुश्रीफ समर्थकांनी सुरू केलेली निदर्शने, यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंत्री मुश्रीफ व सोमय्या यांच्यातील आव्हान-प्रतिआव्हानांमुळे राजकीय कलगीतुरा रंगला आहे.

हे ही वाचा :

Live : किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद, कराड (सातारा)

Back to top button