पुणे : गो ग्रीनला थंड प्रतिसाद , पाच लाख वीजग्राहक या योजनेचे  लाभार्थी | पुढारी

पुणे : गो ग्रीनला थंड प्रतिसाद , पाच लाख वीजग्राहक या योजनेचे  लाभार्थी

पुणे : पुढारी वृत्तसेवा  : महावितरणचे कामकाज पेपरलेस करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ग्राहकांना ऑनलाइन वीजबिले देण्यासह वीजबिल भरणा ऑनलाइन करता यावा यासाठी ’गो ग्रीन योजना’ राबवण्यात येत आहे. मात्र या योजनेला राज्यभरातून अतिशय थंड प्रतिसाद मिळत असून, दोन कोटी पाच लाख ग्राहकांपैकी केवळ पाच लाख वीजग्राहक या योजनेचे  लाभार्थी आहेत.

केवळ तीन लाख 56 हजार ग्राहकांनी लाभ घेतला आहे. गो ग्रीनमध्ये पुणे परिमंडळ आघाडीवर राज्यात ’गो ग्रीन’ योजनेचा लाभ घेणार्‍या ग्राहकांमध्ये पुणे परिमंडळ आघाडीवर आहे. या परिमंडळात 89 हजार 936 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्या पाठोपाठ कल्याण (40,144), भांडूप (34,917), नाशिक (33,141) आणि बारामती (26,398) यांचा क्रमांक लागतो. मात्र, उर्वरित
ठिकाणची आकडेवारी निराशाजनक आहे. दरम्यान राज्यात महावितरणचे 2 कोटी 8 लाख घरगुती ग्राहक आहेत.

Back to top button