Bangladesh vs India 3rd ODI | बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात कुलदीप यादवचा समावेश | पुढारी

Bangladesh vs India 3rd ODI | बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात कुलदीप यादवचा समावेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी (Bangladesh vs India, 3rd ODI) गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पहिल्या दोन सामन्यांत टीम इंडियाचा बांगलादेशने पराभव केला आहे. आता तिसरा आणि अंतिम वन डे सामना उद्या शनिवारी (दि.१०) रोजी होणार आहे. (Bangladesh vs India, 3rd ODI)

भारताचा कर्णधार रोहित शर्माला दुसऱ्या वन डे सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना दुसऱ्याच षटकांत अंगठ्याला जबर मार लागला होता. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याच्या दुखापतीचे मूल्यांकन केले आणि ढाका येथील स्थानिक रुग्णालयात त्याचे स्कॅनिंग करण्यात आले. रोहित शर्मा तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी मुंबईला रवाना झाला असून तिसऱ्या वनडे सामन्यात तो खेळू शकणार नाही. आगामी कसोटी मालिकेसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत नंतर निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

वेगवान गोलंदाज कुलदीप सेन याला पहिल्याच वन डे सामन्यानंतर पाठीत दुखत असल्याचा त्रास जाणवला होता. त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला. वेगवान गोलंदाज दीपक चहरला दुसऱ्या वन डे सामन्यादरम्यान डाव्या हाताच्या दुखापतीचा त्रास झाला आणि तो मालिकेतूनही बाहेर पडला.

भारत विरुद्ध बांगला देश (IND Vs BAN) एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बुधवारी भारताला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. सामन्यात बांगला देशची फलंदाजी सुरू असताना दुसर्‍या षटकात झेल घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने दिलेल्या माहितीनुसार दुखापतीनंतर रोहित आता मायदेशी परतणार आहे. बांगला देश विरुद्ध मालिकेतील तिसरा सामना हा 10 डिसेंबरला चितगाव येथे होणार आहे. आता या सामन्यात व 14 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या कसोटी मालिकेत रोहितच्या जागी अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळण्याची शक्यता आहेे.

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यासाठी भारताचा संघ : केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेट कीपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.

हे ही वाचा :

Back to top button