BCCI : तीन महिने क्रिकेटचा भडिमार | पुढारी

BCCI : तीन महिने क्रिकेटचा भडिमार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन घरच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर, संघ जानेवारी-फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वन-डे आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिकाही खेळणार आहे. (BCCI)

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघही फेब्रुवारी-मार्चमध्ये भारत दौर्‍यावर येणार आहे. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाईल. बांगलादेशविरुद्ध वन-डे आणि कसोटी दौरा पूर्ण केल्यानंतर भारतीय संघ पुढील तीन महिने मायदेशात खेळेल. ज्याला जानेवारीत श्रीलंका दौर्‍यापासून सुरुवात होईल. पुढील वर्षी भारतात होणार्‍या विश्वचषकाच्याद़ृष्टीने या तीन मालिका अतिशय महत्त्वाच्या आहेत. टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध पहिली टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. (BCCI)

भारत-न्यूझीलंड टी-20 आणि वन-डे मालिका

पहिला वन-डे सामना : 18 जानेवारी (हैदराबाद)
दुसरा वन-डे सामना : 21 जानेवारी (रायपूर)
तिसरा वन-डे सामना : 24 जानेवारी (इंदौर)

पहिला टी-20 सामना : 27 जानेवारी (रांची)
दुसरा टी-20 सामना : 29 जानेवारी (लखनौ)
तिसरा टी-20 सामना : 1 फेब्रुवारी (अहमदाबाद)

भारत-श्रीलंका टी-20 आणि वन-डे मालिका

पहिला टी-20 सामना : 3 जानेवारी (मुंबई)
दुसरा टी-20 सामना : 5 जानेवारी (पुणे)
तिसरा टी-20 सामना : 7 जानेवारी (राजकोट)

पहिला वन-डे सामना : 10 जानेवारी (गुवाहाटी)
दुसरा वन-डे सामना : 12 जानेवारी (कोलकाता)
तिसरा वन-डे सामना : 15 जानेवारी (त्रिवेंद्रम)

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी व वन-डे मालिका

पहिला कसोटी सामना – 9 ते 13 फेब्रुवारी (नागपूर)
दुसरा कसोटी सामना – 17 ते 21 फेब्रुवारी (दिल्ली)
तिसरा कसोटी सामना – 1 ते 5 मार्च (धर्मशाळा)
चौथा कसोटी सामना – 9 ते 13 मार्च (अहमदाबाद)

पहिला वन-डे सामना – 17 मार्च (मुंबई)
दुसरा वन-डे सामना – 19 मार्च (विशाखापट्टनम)
तिसरा वन-डे सामना – 22 मार्च (चेन्नई)

Back to top button