Lionel Messi Tattoo : मेस्सीच्या प्रेमात ‘तिने’ शरीरावर काढले तब्बल सात टॅटू; आठव्याची तयारी | पुढारी

Lionel Messi Tattoo : मेस्सीच्या प्रेमात ‘तिने’ शरीरावर काढले तब्बल सात टॅटू; आठव्याची तयारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ कर्णधार लियोनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली उपात्यंपूर्व फेरीत दाखल झाला आहे. उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा सामना नेदरलँडशी होणार आहे. अर्जेंटिनाचे चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहेत. मेस्सी प्रमाणेच त्याची निस्सीम चाहती मिस बम बम ही सुद्धा या विश्वचषकाच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे. (Lionel Messi Tattoo)

ब्राझिलियन ब्युटीचा किताब जिंकणारी आणि मिस बम बम म्हणून प्रसिद्ध असलेली सुझी कॉर्ट्झ अर्जेंटिनाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीची खूप मोठी फॅन आहे. आत्तापर्यंत तिने मेस्सीचे शरीरावर सात टॅटू काढले आहेत आणि आता ती मेस्सीचा आठवा टॅटू शरीरावर काढणार आहे. (Lionel Messi Tattoo)

मिस बम बमचे पूर्ण नाव सुझी कॉर्टेझ आहे. ती प्रोफेशनल मॉडेल आहे. तसेच ती लिओनेल मेस्सीची मोठी फॅन आहे. कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ चॅम्पियन होईल, अशी मिस बम बमला पूर्ण आशा आहे. या सोबतच मिस बम बमने मेस्सीबाबत एक खास घोषणा केली आहे. तिने आपल्या शरीरावर मेस्सीचा सर्वात मोठा टॅटू काढणार असल्याचे सांगितले आहे. याआधी तिने आपल्या शरीरावर मेस्सीचे सात टॅटू काढले आहेत.

पायावर काढणार मेस्सीचा आठवा टॅटू

मेस्सीच्या पायावर जसा टॅटू आहे तसाच टॅटू मिस बम बम आपल्या पायावर काढणार आहे. ज्यामध्ये मेस्सीच्या जर्सी क्रमांकासह फुटबॉलचा समावेश असणार आहे. मिस बम बमने ब्राझीलची सौंदर्य स्पर्धादेखील जिंकली आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर मेस्सीच्या जर्सीसह फोटो शेअर करत असते. आपल्या नवीन टॅटूबद्दल बोलताना ती म्हणाली, मेस्सीसाठी मी माझ्या शरीरावर एकूण ७ टॅटू काढले आहेत.

हेही वाचा;

Back to top button