वाशीम: ले-आऊट धारकाला जिवे मारण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची मागणी | पुढारी

वाशीम: ले-आऊट धारकाला जिवे मारण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची मागणी

वाशीम, पुढारी वृत्‍तसेवा : कारंजा नगर पालिकेच्या नियमानुसार अकृषक परवानगी प्राप्त ले-आऊट धारकाला १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तर रक्कम न दिल्यास अकृषक परवानगी रद्द करायला लावणार अशी चेतावणी देत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गौरव विजय महाजन रा. कारंजा याने कारंजा शहर पोलिसांत धमकीबाबत तक्रार दिली. ले-आऊटमध्ये भूमि सीमांकन करतांना गैरअर्जदार रफतउल्ला रफीउल्ला काझी सह अब्दुल राजिक अब्दुल अजीम व दोन अनोळखी व्यक्तींनी १० लाख रुपयांची मागणी केली. रक्कम न दिल्यास अकृषक परवानगी रद्द करायला लावणार अशी चेतावणी देऊन शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे, असे तक्रारीत म्‍हटले आहे.

कारंजा शहरातील ले – आऊट धारकांना कारंजा नगरपालिकेद्वारे नियमानुसार विकास परवानगी देण्यात आली होती. या ले-आऊट धारकांविरुद्ध गैरअर्जदार रफतल्लाह काझी यांनी तक्रार दाखल केली होती. दरम्यान दिनांक ०४ नोव्हेंबर २०२२ रोजी नगर परिषद कारंजा द्वारे एका पत्रान्वये ले – आऊट धारकांना दिलेली परवानगी रद्द किंवा स्थगित का करण्यात येऊ नये अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आली. त्या नोटीसला सर्व ले-आऊट धारकांनी विद्यमान दिवाणी न्यायाधीश कारंजा यांच्या न्यायालयात आवाहन दिले होते.
दरम्‍यान, दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ आणि दि.१६ नोव्हेंबर २०२२ दोन दिवशी पुन्हा सुनावणी होऊन लेआऊट धारकाचे अर्ज मंजूर करण्यात आला.

या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी गौरव विजय महाजन यांच्या फिर्यादीवरून रफतउल्ला रफीउल्ला काझी सह अब्दुल राजिक अब्दुल अजीम व दोन अनोळखीवर गुन्हा दाखल केला आहे.

.हेही वाचा 

धुळे : शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणची धडक मोहीम 

नाशिक विभागात ६० टक्के गोवर लसीकरण; आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर

जळगाव : रावेर शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणात नऊ जणांना अटक 

Back to top button