बीड : सिरसाळा येथे दहा हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात | पुढारी

बीड : सिरसाळा येथे दहा हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

परळी-वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके याला  १० हजार लाच घेताना  रंगेहाथ पकडण्यात आले. आज (दि. 8) दुपारी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने  कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व अंमलदारास लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांनतर या दोघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना पकडण्यात आल्याने जिल्हा पाेलीस दलात खळबळ उडाली आहे.

 तक्रारदाराला दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली, यापैकी १० हजार लाच घेताना प्रकाश शेळके याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची पोलीसांनी माहिती दिली.

हेही वाचा

Back to top button