रायगड : करंजा येथे मच्छीमार बोटीला आग | पुढारी

रायगड : करंजा येथे मच्छीमार बोटीला आग

उरण : पुढारी वृत्तसेवा : करंजा बंदरात नांगरून ठेवलेल्या बोटीला आज (दि. ६) सकाळी साडे दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत बोटीचे मोठे अर्थिक नुकसान झाले. बोटीवरील खलाशी बोटीत जेवण बनवत असताना स्टोव्हचा स्फोट होऊन आग लागली असल्याचे सांगितले जात आहे. आग लागली त्यावेळेस बोटीत ३ परप्रांतीय खलाशी होते.

आग लागल्याचे समजताच इतर मच्छिमारांनी नांगर तोडून बोट खेचत किनाऱ्यावर आणली.आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सिडको, जेएनपीटी आणि ओनजीसीच्या अग्निशमन दलाच्या बंबानी आग विझविली. या दुर्घटनेत  बोटीचे मोठ्या प्रमाणात अर्थिक नुकसान झाले आहे. करंजा येथील अलंकार गजानन नाखवा यांच्या मालकीची ही बोट होती. अशा प्रकारची घटना यापूर्वी करंजा बंदरावर घडली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा बंदरावर उभ्या करण्यात येणाऱ्या मच्छीमार बोटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button