Akshay Kumar : शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून ‘अक्षय’ करणार ‘मराठी’ चित्रपटात पदार्पण, पहा पहिली झलक (Video) | पुढारी

Akshay Kumar : शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून 'अक्षय' करणार 'मराठी' चित्रपटात पदार्पण, पहा पहिली झलक (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज आहे. (Akshay Kumar) जय भवानी, जय शिवाजी ! अशी कॅप्शन लिहित अक्षयने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. तो ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात हा अभिनेता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात तो या ऐतिहासिक चित्रपटात दिसेल. (Akshay Kumar)

अक्षयने एका तासापूर्वी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी लिहिलंय-जय भवानी 🚩, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत 😍🚩🧡, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत || श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ||❤️🙏🏻🚩, Ye movie ko 40 din me khatam mat karo sir, thoda time aur effort dijiye. Bhagwan ka darja dete hai log Chatrapati Shivaji maharajji ko, Jai Bhawani, Jai ShivaJi ⛳❤, छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🏻🙏🏻, After ruining samrat prithviraj Akshay kumar on his way to ruin one more iconic personality.

तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी अक्षयला सुनावलं आहे. अभिनेता शरद केळकर या भूमिकेसाठी परफेक्ट असल्याचे म्हटले आहे.

Akshay is not perfect for roll of Great king chhatrapati shivaji maharaj, Sharad kelkar sir ko kyu nhi mila maharaj ka role😢, I think ranveer better then akashye, कही से नहीं लग रहे है आप शिवाजी, Acting nahi aata hain Aapko., Not even 1% it is close to that look of the great Maharaj!, छत्रपति शिवाजी महाराज जेसे तेवर और एटीड्यूड नजर नहीं आ रहा है, अंगात थोडा कणखर पणा 🔥 आणि चेहऱ्यावर थोडं हसू असावं बाकी 1 No. 👌, शरद केलकर Sir always best Option in छत्रपती शिवाजी महाराज 💯🚩

या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’मध्ये अक्षय कुमारने ऐतिहासिक भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा तो ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटातून तो मराठी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘बच्चन पांडे’पासून सुरू झालेला हा फ्लॉप प्रवास ‘राम सेतू’ला जाऊनही संपला नाही. बॉलीवूडमधील अक्षयच्या चित्रपटांचा आलेख सातत्याने घसरत असतानाच आता अक्षय मराठी इंडस्ट्रीत नशीब आजमावण्यासाठी निघाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

Back to top button